Saturday, July 7, 2007
poem marathi
आयुष्य असचं जगायचं असतंजे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतंआयुष्य असचं जगायचं असतंकुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतंकुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतंआयुष्य असचं जगायचं असतंदु:ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतंपंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,आयुष्य असचं जगायचं असतंमरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतंइच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment